कॅलिफोर्नियातील हर्स्ट कॅसल

जगातील अनेक इमारती आपल्या खास वैशिष्ठ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या आहेत. अमेरिकेतही अशा बर्‍याच इमारती आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन लुई अेबिस्पो काऊंटी मधील क्यूस्टा एनकान्डाटा नावाचा महालसुद्धा असेच लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. दाट जंगलात आणि […]

जपानमधील सुपरफास्ट बुलेट ट्रेन

जपानमधील टोकिया आणि आमोरी या शहरादरम्यान हायबुसा म्हणजे बहिरी ससाणा ही जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन धावते. ही बुलेट ट्रेन तासाला ५०० कि. मी. वेगाने अंतर कापते.

टॉवर ऑफ लंडन

विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.

हसन मशीद – मोरोक्को

मोरोक्कोमध्ये असणारी हसन मशीद ही जगातली सातव्या क्रमांकाची मोठी मशीद म्हणून प्रसिध्द आहे. या मशिदीचा मिनार २१० मीटर उंच आहे. या मिनाराला ६० मजले असून, सुमारे १ लाख लोक येथे नमाज पडू शकतात.

ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट

ऑस्ट्रेलियातील लॉर्ड होवे बेट हे ज्वालामुखीनिर्मित बेट असून, या ठिकाणी हजारो प्राण्यांच्या जाती आढळतात. पक्षी अभ्यासकांसाठी हे बेट महत्त्वपूर्ण आहे. हे बेट १५४० हेक्टर परिसरात आहेत.

चीनमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे पूल

चीनमधील दॅनयांग कुंशन ग्रॅण्ड ब्रिज हा जगातील हाय स्पीड रेल्वेसाठी बांधलेला सर्वात लांब पुल आहे. या पुलाची लांबी १६४.८ किलोमीटर तर रुंदी ८० मीटर आहे. या पुलावरुन जाणारा रेल्वेमार्ग शांघाय आणि नानजिंग या शहरांना जोडतो. […]

अमेझॉन – जगातली सर्वात मोठी नदी

अमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी मानली जाते. अर्थात लांबीनुसार नाही.. तर तिच्यातून वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहानुसार. प्रति सेकंदाला तिच्यातून तब्बल १,२०,००० क्युबिक मीटर्स पाणी वाहत असते. लांबीनुसार अमेझॉन जगातली दुसरी लांब नदी ठरते. हिची लांबी आहे ६,४०० कि.मी. म्हणजेच नाईलपेक्षा जेमतेम ३०० […]

व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश

जगात एकूण १७  देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे. या शहराचे क्षेत्रफळ ०.२ चौरस मैल आहे. या शहराची लोकसंख्या हजारापेक्षा कमी आहे. जगभरातील  रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजेच पोप यांचा मुक्काम येथे असतो.

नाईल – जगातील सर्वाधिक लांब नदी

जगातील सर्वाधिक लांब नदी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील नाईल (Nile) नदीची नोंद घेतली जाते. पश्चिम आफ्रिकेतील बुरुंडी येथील व्हिक्टोरिया पर्वतापासून उगम पावणार्‍या नाईलचा प्रवास इथियोपिया, युगांडा, सुदान, इजिप्त या देशांना पार करतो.  या मोठ्या प्रवासानंतर ती भूमध्य समुद्रला येऊन मिळते. या नदीची लांबी ६६९५ किमी आहे.

जगातील सर्वात मोठा आशिया खंड

आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. १ कोटी ७२ लाख १२ हजार वर्ग मैल क्षेत्रफळ असलेल्या या खंडात ४७ देश आहेत. या देशांची एकूण लोकसंख्या ३८७९०००००० एवढी आहे.

1 29 30 31 32