नागपूरची सीताबर्डी

सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना […]

लोकमान्यांचे जन्मस्थळ रत्नागिरी

रत्नागिरी हे कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. येथील किल्ला प्रसिध्द असून, तो विजापूरच्या आदिलशहाने बांधलेला आहे. देशाच्या पश्विम किनार्‍यावर वसलेले या शहरातील बंदर प्रसिध्द आहे. येथील थिबा पॅलेस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेले पतितपावन […]

प्राचीन मांढळ

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.

भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे. सोलापूरपासून ४२ किमी अंतरावर हे नदीकाठी वसलेले प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक इथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी गर्दी […]

पुणे शहरातील सात व्यापारी पेठा

आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. पुण्याचे प्रशासक रंगो बापुजी धडफळे यांनी इ.स. १६३० मध्ये शहाजी राजांच्या आज्ञेवरुन कसबा, सोमवार, रविवार आणि शनिवारपेठेची बांधणी केली आहे.

जिंतूरच्या सहा जैन लेण्या

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर […]

मनमाडचे अंकाई-टंकाई किल्ले

नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत. येथून ५ किलोमीटरवर अंकाई, […]

मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर

लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्‍या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे […]

पुणे येथील लाल महाल

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते.  त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली. ३५० वर्षापूर्वीची साक्ष देणार्‍या या महालाच्या स्मृती जपण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहराच्या मध्यभागी सन १९८८ साली लाल महाल या नावाने […]

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण

फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. फलटणचे श्रीराम मंदिर प्रसिध्द असून येथे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत रथोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी […]

1 5 6 7 8 9 11