बॅसिलिका चर्च

फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्‍या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले.

येशू ख्रिस्ताच्या पवित्र ह्रदयाला ही चर्च समर्पित आहे. या चर्चची रचना पॉल अबाडी यांनी केली. या चर्चच्या रचनेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. सुमारे ७७ वास्तुरचनाकारांकडून अबाडी यांची निवड करण्यात आली होती.

या चर्चच्या बांधकामास सुमारे ७ दशलक्ष फ्रेंच फ्रॅंक इतका खर्च आला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*