पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द गाव आहे. या गावाचे गेल्या काही वर्षात छोट्या शहरात रुपांतर झाले आहे.
पुणे -नाशिक मार्गावर, पुणे शहरापासून ३३ किमी वर असलेल्या असलेल्या चाकणजवळच वेगाने विकास होणारी MIDC ची औद्योगिक वसाहत आहे. आता तर तेथे विमानतळसुद्धा प्रस्तावित आहे.
खेड तालुक्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या भागाचे महत्त्व आणखी वाढले. त्यातच पुणे-नाशिक रेल्वेच्या निर्णयानंतर येथे गुंतवणूकदारांचा ओघ वाढला असून अॅटलस कॉपकोने येथे सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.सध्या चाकणमध्ये फोक्सवॅगन, बजाज, महिंद्रा, ह्युंडाई, मर्सिडीज, ब्रिजस्टोन अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत. याशिवाय इतर ६०० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. या बड्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
हे गाव १४ व्या शतकापासून जहागीरदारीचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. जहागीरदारीमुळे चाकण हे विकसित झाले. ब्रिटिश काळापर्यत या गावाला राजकारणात महत्त्व होते. खेड तालुक्यात असलेल्या या गावाची कांद्याची मोठी बाजारपेठ अशीही ओळख आहे.
Leave a Reply