अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

संत ज्ञानेश्वर – यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली.
साईबाबा – हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते.
सदाशिव अमरापूरकर – प्रसिद्ध हिन्दी – मराठी सिने अभिनेते
रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन – थोर स्वातंत्र्यसेनानी – थोर स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन यांनी स्वातंत्र्यसंग्रामात नगरचे नेतृत्व केले. रावसाहेब व अच्युतराव यांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते व नेते घडवले, त्यातूनच पुढे जिल्ह्याचा विकास साधला गेला.
भाई सथ्था -कम्युनिस्ट नेते
सेनापती दादा चौधरी- कम्युनिस्ट नेते
मधू दंडवते – संसदपटू
कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक व लक्ष्मीबाई टिळक – एकेकाळी आपल्या कवितांनी महाराष्ट्राला वेड लावणारे कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक व त्यांच्या पत्नी ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांचे वास्तव्य नगरमध्येच होते.
अण्णा हजारे (किसन बाबूराव हजारे ) – हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*