विनायक आदिनाथ बुवा (वि. आ. बुवा)

विनोदी रंगभूमी, विनोदी साहित्य आणि विनोदी चित्रपटांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रानी अक्षरश: या कलेवर प्रेम केलं आहे. आणि म्हणूनच विनोदी साहित्य इथून पुढे ही निर्माण होत राहिल; खूप कमी विनोदी साहित्यिक आपल्याला लक्षात राहतात त्यातलेच एक महत्वपूर्ण नाव म्हणजे वि.आ.बुवा, एखाद्या व्रतस्थाप्रमाणे ते आपल्या परिने लेखन करत राहिले, आणि विनोदी साहित्याला मराठीत दर्जा प्राप्त करुन दिला. त्यांच्या विनोदी लेखनात कधीही बेबनाव आणि अभिनिवेष नव्हता. रोजच्या आयुष्यातील माणसांच्या गमती-जमती व त्यांच्या सहज प्रवृत्तींमधूनतयार होणारी विसंगती आणि वास्तवाचा अतिरेक करुन जन्माला येणारी विनोदी हीच त्यांची मुख्य आयुधे होत.

सामान्य व्यक्तींचं आयुष्य, जन सामान्यांचे प्रश्न व समस्या हा बुवा यांच्या लेखनाचा विषयाचा असायचा. “अकलेचे तारे”, “बिल दिया दर्द लिया”, “सखी शेजारणी”, “तोचि पुरुष भाग्याचे”, ही नावं जरी ऐकली किंवा नुसती वाचली तरीपण त्यांच्या विषयांचं स्वरुप लक्षात येईल. प्रचंड प्रमाणात वाचन आणि विपुल ज्ञान असून ही त्यांचं लेखन नेहमीच सामान्य माणसाला समजेल अशा साध्या-सोप्या भाषेत असायचं, दिवाळी अंक व अनेक मासिकांमधून ही त्यांनी बर्‍याचशा प्रमाणात लेखन केलं असून त्यांनी दीडशे पेक्षा ही अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 Comment on विनायक आदिनाथ बुवा (वि. आ. बुवा)

  1. परिपुर्ण व व्यवस्थित माहिती, नव पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे! धन्यवाद??

Leave a Reply to Jayant buwa Cancel reply

Your email address will not be published.


*