तोरणे, सुधाकर

तोरणे सुधाकर

– सुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.

– उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.

– १२ वर्षापूर्वीच्या १९९०-९१ सिंहस्थ काळांत तर त्यांनी नाशिक येथे उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी असा दुहेरी पदभार सांभाळला व सिंहस्थ काळात उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून नागरिकांकडून गौरवपुरस्कार प्राप्त.

– मंत्रालयात उपसंचालक म्हणून वृत्त, अल्पबचत, लॉटरी व जनसंपर्क या विभागात काम, तीन वर्षांत संचालकपदी नियुक्ती.

– शासकीय नोकरीत पदार्पण करण्यापूर्वी गांवकरी, विशाल सह्याद्री या वृत्तपत्रात पत्रकारिता.

– पुणे जिल्ह्यात असताना सर्वोत्कृष्ट जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याणाच्या कार्यात महाराष्ट्र शासनाने सुवर्णपदक प्रदान तसेच जिल्हा परिषद पुणेकडून गौरव. महाराष्ट्र शासनाच्या विकास वार्ता लेखन स्पर्धेत उत्कृष्ट लेखनाबद्दल दोनवेळा राज्यस्तरावरच्या विकास वार्तापुरस्काराचे मानकरी.

– दूरदर्शनवर शिवशाही आपल्या दारी या मालिकेच्या २६ भागांची संकल्पना, लेखन व निर्मिती तसेच दिग्दर्शनातही सहाय्य.

– अॅडव्हान्टेज महाराष्ट्र या औद्योगिक व अॅडव्हान्टेज अॅग्रीकल्चर या मुंबईत भरलेल्या कृषिविषयक उपक्रमात व प्रदर्शनात सक्रीय सहभाग.

– नवी दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर येथे व इतरत्र अनेक चर्चासत्रे, परिसंवाद परिषदेत प्रत्यक्ष सहभाग.

– शासन सेवा काळात जनसंपर्काच्या विविध मोहिमा कल्पकतेने यशस्वीपणे राबविल्या.

– पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरचे संस्थापक सदस्य.

– ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे नवी दिल्ली आजीव सदस्य.

– दूरदर्शनवर अनेकवेळा मुलाखती, चर्चेत भाग.

– आकाशवाणीवर विविध भाषणे, श्रुतिका.

– कहाणी सरत्या रातीची ह्या तीन अंकी रहस्यमय नाटकाचे लेखक.

– गांधीजींच्या हास्यकथा, आदिवासी जीवनदर्शन या पुस्तकांचे लेखक.

– विकास कार्यासंदर्भात वृत्तपत्र व नियतकालिकांतून विपूल लिखाण.

– अनेक लघुकथा, एकांकिका प्रकाशित.

– नेपाळसह भारतातील सर्व राज्यात प्रवास.

– एक उत्कृष्ठ जनसंपर्क अधिकारी म्हणून शासनाकडून गौरव.

– राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संपादक, पत्रकार, साहित्यिक, चित्र-नाट्य कलावंत, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते, पंचायत राज्य व्यवस्थेचे पदाधिकारी यांच्याशी तसेच प्रत्यक्ष लोकांशी थेट संपर्क.

– निवृत्तीनंतर जनसंपर्क सल्लागार म्हणून कार्यरत.

– सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे सहयोगी संपादक (प्रकल्प) म्हणून कार्य.

– विविध सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी कार्यात विविध उपक्रमात सक्रीय सहभाग.

1 Comment on तोरणे, सुधाकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*