गुप्ते, इंदुताई

इंदुताई गुप्ते ह्या ठाणे शहर महिला मंडळाच्या सक्रीय सदस्या होत्या! या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसंच आर्थिक क्षेत्रांमध्ये ठाणे नगरीला प्रगतीपथावर घेवून जाणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली. १९६० साली त्यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केले होते. १९४९-१९५० सालापासून त्यांनी हरिजन वस्तीत जावून संक्रांतीचा हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याचा, कल्पक व अभिनव प्रकल्प आखून आदिवासी महिलांच्या आयुष्यात स्वयंसिध्दतेची नवी पहाट आणण्याचा वसा त्याकाळी हाती घेतला होता.

अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्याच्या दृष्टीने त्यांनी, त्यांच्या इतर महिला सहकार्‍यांसोबत इंग्रजीचे वर्ग सुरू केले. निधी गोळा करून शिवण मशिन्स विकत घेतल्या, मशिन ठेवायला जागा नसतानासुध्दा शक्य होईल तिथे मशिन ठेवून स्त्रियांना व मुलींना शिवण शिकवून शिवणाच्या परीक्षेला बसवलं, त्यामुळे अनेक महिलांना शिवणकामात पदविका प्राप्त करता आल्यामुळे व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला .

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*