ग्रामपंचायतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत पोहचलेल्या नेत्यांची माहिती

राम प्रधान

संख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ पदावर विराजमान झाल्यानेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि १९५२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला. […]

राजेश टोपे

विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते. […]

राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर

मालोजीराजे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी सुधारणांचा कारभार पहिला होता. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. […]

राजमाता विजयाराजे शिंदे

विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. […]

मुकुंद जयकर

वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. […]

माधवराव शिंदे

राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले. […]

माधव भंडारी

एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. […]

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते. […]

प्रमोद नवलकर

सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले. […]

प्रतिभाताई पवार

शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’ […]

1 2 3 14