होळकर, अहिल्याबाई

अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती.” “अहिल्याबाईचे असामान्य कर्तुत्वाने तिच्या रयतेचे तिने मन जिंकले, तसेच मराठ्यांमधील नाना फडणवीस सकट सर्व उच्च धुरीणांचे.माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.अलिकडच्या काळातील चरीत्रकार तिला ‘तत्वज्ञानी राणी’ असे संबोधतात.याचा संदर्भ बहुतेक ‘तत्वज्ञानी राजा’ भोज यासमवेत असु शकतो.
[…]

अवचट, (डॉ.) अनिल

डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत. त्यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. […]