सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्या गावाची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. करमाळ्यापासुन अवघ्या ३२ कि मी. अंतरावर केम आहे. येथे असलेल्या १५ कारखान्यांत कुंकवाची निर्मिती होते. सौभाग्याचं हे लेणं आता सातासमुद्रापार गेलं आहे.
चिंचुका पावडर आणि रसायन यांच्या मिश्रणापासून हे कुंकू बनतं. सर्व धार्मिक ठिकाणी इथलंच कुंकू वापरलं जातं. प्राचीन काळापासुन याची निर्मिती होत असून आता याला अनिवासी भारतीयांकडूनही मागणी येते. त्यामुळे अमेरिका, इंग्लंड, श्रीलंका या देशातही ते जाऊ लागलंय.
Leave a Reply