केशर श्रीखंड

साहित्य : ५०० ग्रॅम ताजे दही, ५० ग्रॅम पिठीसाखर, १० ते १५ धागे केशर, १ चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर – ३ ते ४  वेलची , ५ ते ६ बारीक कापलेले पिस्ते, ५ ते ६ बारीक कापलेले बदाम. कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून २ ते ३ तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या. तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.