पुणेरी मिसळ

Puneri Misal

साहित्य :-

१. एक वाटी वाटाणे तासभर भिजत घालून कुकरमध्ये ३ शिटया देणे
२. एक वाटी मोड आलेली मटकी घेऊन कुकरमध्ये ३ शिटया देणे
३. दोन बारीक चिरलेले कांदे
४. एक बारीक चिरलेला टोमॅटो
५. छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
६. एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवणे
७. मध्यम आकाराचे २ बटाटे उकडून, सोलून, मध्यम आकाराच्या फोडी करणे
८. एक वाटी नायलॉन चे पोहे
९. एक वाटी तिखट जाड शेव
१०.एक वाटी फरसाण
११. डावभर तुरीची शिजवलेली डाळ

कृती :-

पोह्यांचा चिवडा: कढईत १ छोटा टीस्पून तेल गरम करण्यास ठेवावे.
त्यात १ टीस्पून मोहोरी , २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, १ टीस्पून डाळं, चिमुटभर हिंग, २ टेबल्स्पून दाणे, २ काड्या कढीपत्ता घालून फोडणी करावी.
बर्नर बंद करून कढई खाली उतरवावी, त्यात थोडी हळद, चवीनुसार, वाटीभर नायलॉन चे पोहे, नखभर तिखट घालून कालवून घ्यावी. यात १ टीस्पून MTR ची चटणीपूडी पावडर कालवावी.

तेलावर मोहोरी, हिंग व काळ्या मसाल्याची फोडणी देऊन, १ टीस्पून लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून, त्यावर शिजवलेली डाळ घालून २ वाट्या पाणी घालून उकळवून घ्यावी, व बाजूस काढून ठेवावी.

१ टेबल्स्पून तेलावर चिमुटभर हिंग, १ टीस्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घालून परतणे. नंतर १ वाटी शिजलेले वाटाणे, अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद घालून एक उकळी आणून बाजूस काढून ठेवावे.

उसळः तेलावर मोहोरीची फोडणी घालून मटकी, १ टीस्पून कच्चे जिरे, चिमुटभर हिंग, अर्धा टीस्पून तिखट, १ टीस्पून काळा मसाला, लहान सुपारीइतका गूळ, १ आमसुल आणि १ टेबल्स्पून भाजलेले शेंगदाणे घालून नेहेमीप्रमाणे उसळ शिजवावी.

शिजवलेल्या डाळीचे पाणी वेगळे काढून ठेवून डाळ वाटाण्यात मिसळावी.

तर्री वेगळे काढून ठेवलेले पाणी १ टीस्पून तेलात (आवडत असल्यास २ लसणाच्या पाकळ्या घालून) पाव टी स्पून तिखट व अर्धी वाटी टोमॅटो घालून उकळत ठेवावे.

एका प्लेट मध्ये १ डाव कढत वाटाणे-डाळ घालावी. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या ४-५ फोडी घालून, वर एक डाव कढत उसळ घालणे, त्यावर एक डाव नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा घालून, एक डाव जाडी शेव भुरभुरणे, १ टेबल्स्पून कच्चा कांदा व आवडीप्रमाणे कोथिंबीर घालावी. सर्व्ह करतांना पळीभर तर्री घालावी. हवे असल्यास वरून थोडे लिंबू पिळावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*