पनीर बटर मसाला

Paneer Butter Masala

साहित्य –

१०० ग्रॅ. पनीर
५० ग्रॅ. दही
२५ ग्रॅ. काजू
कोथिंबीर
मिरची
५० ग्रॅ. लोणी
कसुरी मेथी
२ कांदे
२ टोमॅटो
जीरे
खडा मसाला
आले व लसणाची पेस्ट
सजावटीसाठी क्रीम
गरम मसाला टाकावा
मीठ

कृती –

कांदा आणि पनीर तळून घ्यावे. दूध वापरुन काजू थोडे वाटून घ्यावे. टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा.

एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यानंतर त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी. नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे. या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी.

शिजल्यानंतर वरून पनीर, दही, कोथिंबीर व क्रीम टाकुनघालून सजवावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*