हरे मटर की पुरी

साहित्य१ वाटी हिरवे वाटाणे, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ वाट्या मैदा, तळणासाठी तेल.

कृतीएका भांड्यात मैदा घ्यावा त्यात मीठ व थोडेसे मोहनाचे तेल घालावे. बेताचे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे व १५-२० मिनिटे झाकुण ठेवावे. एका कढईत थोडेसे तेल गरम करावे त्यात बारीक चिरलेला कांदा व  हिरवे वाटाणे थोडेसे परतून घ्यावे. थोडेसे थंड झाले की बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, बडीशेप, हळद, लाल तिखट व चवीनुसार मीठ
घालून मिश्रण मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावे. तयार पीठाचे समान गोळे करून घ्यावे. एक एक गोळा घ्यावा त्यात तयार सारणाचे मिश्रण थोडे थोडे प्रत्येक गोळ्यात भरावे व पुरी लाटून घ्यावी. एका कढईत तेल गरम करावे त्यात एक एक पूरी खमंग तळुन घ्यावी. गरमा गरम खावयास घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*