मुगाच्या डाळीचे वडे

साहित्य : १ वाटी मुगाची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ,मीठ, जिरे.
चटणी : १ लिंबाएवढी चिंच, तितकाच गूळ, तिखट, मीठ,धनेजिरे पूड व पुदिना
कृती : उडदाची डाळ ४ तास भिजत घालावी. नंतर एकत्र करून त्यात मीठ व जिरेपूड घालावी व त्याचे लहान-लहान वडे करून तळावे. तळलेले वडे बाऊलमध्ये ठेवून त्यावर थोडी चटणी घालून खायला द्यावे. वरून एक चमचा दही व थोडी
जिरेपूड घालावी चटणीसाठी प्रथम चिंच भिजत घालून कोळ तयार करावा. त्यात तिखट, मीठ, गूळ, धनेजिरेपूड व वाटलेला पुदिना घालून कालवावे. सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये चटणी वाटली तरी चालेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*