लोणचे फारसी पुरी

साहित्य-
१वाटी बेसन
१वाटी मैदा
१ छोटा चमच जिरे पावडर
१ छोटा चमच धणे पावडर
१छोटा चमच मीठ
१टेबलस्पून रामबंधू लोणचे मसाला
तेल मोहनासाठी व तळण्यासाठी

कृती-
प्रथम मैदा व बेसन एकत्र करून घ्यावे. नंतर त्यात मोहन घालावे. हाताने चांगले मळून घ्यावे. मग वरील सर्व साहित्य त्यात घालून एकत्र करावे नंतर पाण्याने भिजवावे .
त्या मिश्रणाच्या दोन मोठया पोळया लाटाव्या.
त्या दोन पोळया एकमेकावर ठेवून रोल करावा . मग चाकूने त्या रोलचे तुकडे करावे . नंतर प्रत्येक तुकडा हाताने हलका दाबून थोडा पुरी इतका लाटून घ्यावा . नंतर तेलात तळून घ्यावे . वरून थोडा चाट मसाला भुरकावा . काहीजण लोणचे मसाला पण वरून घालतात .
खूप कुरकुरीत आणि टेस्टी होतात .
दिवाळीला काहीतरी मस्त आणि नवीन फराळाचा पदार्थ म्हणून नक्की करून बघा .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*