दाल बाटी

लागणारे जिन्नस: 

बाटीसाठी –

३ कप गव्हाचे पीठ१/२ कप रवा१ टेबलस्पून दही१ टीस्पून ओवाचिमुटभर खायचा सोडा१ टीस्पून मीठ१/२ कप तूप

डाळीसाठी –

१/४ कप मुग डाळ१/४ कप उडीद डाळ१/४ चणा डाळ१ कप तूर डाळ१ मध्यम कांदा१/२ टीस्पून हळद१ इंच आलं बारीक कापून१ टीस्पून जीरंचिमुटभर हिंग२ सुक्या मिरच्या३-४ लवंगा२ हिरवी वेलची१ इंच दालचिनी१ पमालपत्रं५-६ कडीपत्ता२ टोमॅटो२-३ हिरव्या मिरच्यामीठ२ टेबलस्पून तेलअर्ध लिंबू

क्रमवार पाककृती: 

डाळ –
सर्व डाळी अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर हळद घालून शिजवून घ्या.
पॅनमध्ये तेल तापवून त्यावर जीरं, हिंग, सुक्या मिरच्या, कडीपत्ता ची फोडणी करा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, तमालपत्रं, लवंगा, वेलची, दालचिनी, बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्या. कांदा तांबूस झाला

की शिजवलेली डाळ घाला आणि चांगली उकळी काढा. वरून लिंबू पिळून, बारीक चिरलेली कोथंबीर घाला.

बाटी –
भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, मीठ, खायचा सोडा, दही, ओवा आणि तूप घ्या. पुरेसं पाणी घालून चांगलं मळून ठेवा. (पीठ पोळीसाठी मळतो त्या पेक्षा थोडं घट्टं)
ओव्हन १८०°C ला प्री-हिट करून घ्या. बेकींग-ट्रे ला तुपाचा हात फिरवून घ्या. पीठाचे लिंबापेक्षा थोडे मोठया आकाराचे गोळे करून बेकिंग-ट्रे वर ठेवल्यावर ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे १८०°C वर बेक करून घ्या. २०-२५ मिनिटाने बाटी परतून

साधारण १० मिनिटे बेक करून घ्या. बाटीचा रंग खरपूस तांबूस होईल.
बाटीला थोडे तडे गेले म्हणजे पीठ बरोबर जमून आले आणि बाटी आतापर्यंत बेक झाली समजावे.

बाटी थोडी कोमट होऊ द्या, मग हाताने तोडून वर थोडे तूप आणि भरपूर गरम डाळ घालून, थोडी मऊ, थोडी कुरकुरीत बाटीचा आस्वाद घ्या!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*