गाजराची कोशिंबीर

Carrot Salad

साहित्य :

गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ.

कृती :

सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे.

त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी गाजरावर ओतून हवा असल्यास नारळाचा चव व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*