आजचा विषय ‘चाट’ भाग दोन

चाट’ मधील पाणी पुरी ही सर्वांची आवडती डीश आहे. त्यामुळे तोंडाला एक छान चव येते. पाणी पुरी ही आपण पार्टीला बनवू शकतो तसेच हा पदार्थ आपण संध्याकाळी नाश्ता बरोबर देवू शकतॊ. पाणी पुरी ही जग प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पाणी पुरी म्हणतात नॉर्थ मध्ये गोल गप्पे म्हणतात.
पाणी पुरीचे पाणी बनवतांना दोन वेगवेगळे पाणी बनवले तरी चालते.

चिंचचे गोड पाणी बनवतांना चिंच १/२ तास कोमट पाण्यात भिजत घालून मग त्याचा कोळ काढून त्यामध्ये मीठ, पाणी, गुळ घालून उकळी काढून घ्यावी त्यामुळे हे पाणी खूप छान लागते.

हिरवी तिखट चटणी बनवतांना ह्या मध्ये पुदिना, सैंधव मीठ, आले, हवा असेल तर पाणी पुरी मसाला घालावा. पुदिना व आले आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे मग त्यामध्ये जास्तीचे पाणी घालून व मीठ चांगले मिक्स करावे. ही आंबटगोड गोड पाणी पुरी अगदी अप्रतीम लागते. ही पाणी पुरी घरी बनवून बघा खूप आवडेल. तसेच घरी बनवली तर बनवल्याचा आपल्याला आनंद पण मिळतो. व मनसोक्त खाता पण येते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पाणी पुरी
पाणी पुरीच्या पुरीचे साहित्य
१ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, १ मोठा चमचा तेल, १ १/२ चमचा मीठ.
कृती:- प्रथम सर्व पुरीचे साहित्य एकत्र करून माळून घ्या, नंतर त्याच्या बारीक पुऱ्या करून नंतर कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या.

पाणी पुरीसाठीचे साहित्य
साहित्य:- १/२ वाटी पांढरे वाटणे किवा छोले, 2 मोठे बटाटे (उकडून तुकडे करा), २ मोठे कांदे (बारीक चिरून)
कोथिंबीर, १ लिंबा इतकी चिंच, २ चमचे पाणी पुरी मसाला, १ चमचा सैधव मीठ, ३ हिरव्या मीरच्या (वाटून)
५-६ पुदिना पाने (वाटून), १ छोटा आले तुकडा (वाटून), चिंचेची गोड चटणी,

पाणी पुरी करताना
कुकरमध्ये छोले,मीठ, हळद व थोडे पाणी टाकून मऊ शिजवून घ्या. चिंचेचा कोल काढून ६ वाटी पाण्यात मिसळा. त्यामध्ये पाणीपुरीचा मसाला, हिरवी मिरची, पुदिना,आल, सैधव मीठ, व मीठ घालून हलवून घ्या.
खायला देताना पुरी फोडून त्यामध्ये २-३ छोले, २-३ बटाट्याचे तुकडे, थोडा कांदा, कोथिम्बीर,चिंचेची गोड चटणी, पुदिना चटणी घालून द्या. किवा एका प्लेटमध्ये ६-७ पुरीमध्ये सर्व साहित्य घालून पाणी एका वाटी मध्ये द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

रगडा पॅटीस
साहित्य:- पांढरे वाटाणे, मीठ, हळद, तिखट, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, बारीक शेव, हिरवी व आंबटगोड चटणी.
कृती:- पांढरे वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे थोडे तिखट घालावे. ही उसळ मऊ शिजवून घ्यावी. यात मसाला किंवा फोडणी घालत नाहीत. पॅटीससाठी उकडून घेतलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत.
त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळे थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत. तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्‌स करून शॅलो फ्राय करावेत. सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटीस घेऊन त्यावर रगडा घालावा. मग त्यावर शेव व आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात. याचप्रमाणे छोलेचाट बनविता येते.
पांढऱ्या वाटाण्याऐवजी छोले भिजवून शिजवावेत व आलू टिक्कीसह सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बास्केट चाट
साहित्य:- बटाटे, मोड आलेले मूग, उकडलेले मक्यातचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, दही, कोथिंबीर, दोन्ही चटण्या.
कृती:- कच्चे बटाटे साल काढून जाड किसणीने किसून घ्यावेत. वाटीच्या आकाराच्या छोट्या गाळण्यात थोडा किस सर्व बाजूने दाबून लावावा. मधे पोकळी असावी. हे गाळणे तापलेल्या तेलात सोडावे. सोनेरी रंग आल्यावर गाळणे बाहेर काढून पालथे करावे व बास्केट काढावे.
आता या बास्केटमध्ये शिजविलेले मोड आलेले मूग, मक्या्चे दाणे, कांदा घालावा. वरून थोडे दही घालून कोथिंबिरीने सजवावे. दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

डाएट चाट
साहित्य:- कणकेच्या पुऱ्या, मोड आलेले मूग किंवा कोणतेही कडधान्य, मक्याोचे दाणे, डाएट चिवडा, शेव, हिरवी चटणी व आंबटगोड चटणी.
कृती:- कणकेच्या छोट्या पुऱ्या बेक करून घ्याव्यात. त्यावर शिजवलेले मोड आलेले मूग किंवा कोणतेही कडधान्य घालावे. मग त्यावर मक्याटचे दाणे किंवा सोया शेव घालावी. थोडा बारीक चिरलेला कांदा व दही घालावे. दोन्ही चटण्या व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

क्रिस्पी नूडल्स चाट
साहित्य:- नूडल्स, रिफाइंड तेल, उकडलेला बटाटा, कॉर्न, शेव व दोन्ही चटण्या.
कृती:- नूडल्स शिजवून गाळणीत काढून घ्याव्यात. सर्व पाणी गेल्यावर या नूडल्स रिफाइंड तेलात तळून घ्याव्यात. या नूडल्सवर चिरलेला कांदा, उकडलेले मक्यारचे दाणे घालावेत.
त्यावर थोडी शेव व दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चायनीज चाट
साहित्य :- नूडल्स, उकडलेला मका, बटाटा, मशरूम्स, शेव, चिली सॉस, सोया सॉस.
कृती:- तळलेल्या क्रिस्पी नूडल्सवर उकडलेले मक्या,चे दाणे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. त्यावर शिजवलेले मशरूम्स व बारीक शेव घालावी. आता त्यावर सोया सॉस व चिली सॉस घालावा आणि सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

फ्रूट चाट
साहित्य:- उपलब्ध असलेली सर्व फळे, मिरपूड व मीठ.
कृती:- घरात असलेल्या फळांच्या फोडी करून घ्याव्यात. सर्व्हिंग बाऊलमध्ये त्या फोडी घालून त्यावर मिरपूड व किंचित मीठ घालावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*