वासुदेव गोविंद आपटे

ते मराठीतील एक संपादक, बाल वाड्गमयकार आणि कोशकामकार होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1871 रोजी जळगाव जिल्हयातील धरणगाव येथे. शिक्षण धुळे, इंदूर आणि नागपूर येथे. कलकत्ता विद्यापीठातून ते बी.ए.झाले (1893). बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अध्यापन आणि वृत्तपत्रव्यवसाय हया क्षेत्रांत त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ व्यतीत केला. त्याशिवाय मुंबईच्या जुन्या सचिवालयात `रिपोर्टर ऑफ द नेटिव्ह प्रेस` म्हणूनही काम केले.

ज्ञानप्रकाश (पुणे), मल्हारी मातैड (इंदूर) यांसारख्या पत्रांचे ते संपादक होते. त्यांनीच साप्ताहिक ज्ञानप्रकाशाचे दैनिकात रुपांतर केले. उत्तम बालसाहित्यास प्रोत्साहन देण्यासाठी आनंद हे लोकप्रिय मासिक काढले (1906). लहान मुलांसाठी त्यांनी अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1930 रोजी झाला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*