सबनीस, वसंत

(6 डिसेंबर 1923 ते 15 ऑक्टोबर 2002)

रघुनाथ दामोधर सबनीस, उर्फ वसंत सबनीस यांचा जन्म 6 डिसेंबर 1923 रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुर येथे झाले. तर पुण्यात पुढील महाविद्यालयीन शिक्षण झाले. रा. श्री. जोग यांच्या साहित्य सहकार या संस्थेत ते दाखल झाले. पुण्यातल्या वास्तव्यात पु.ल.देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घनिष्ठ मैत्री त्यांच्या एकुण व्यक्तिमहत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. सबनीस बहुरुपी होते. ते ग्रामिण बाजाचे उत्तम लिखाण करीत होते. तसेच एकांकीका व रहस्यकथाही लिहीत. 1993 साली मुंबईत भरलेल्या नाटयसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. `घरोघरी हिच बोंब`, `कार्टी श्रीदेवी` या नाटकाबरोबरच `विच्छा माझी पुरी करा` यासारखे वगनाटय, तसेच इथुन सुरवात होऊन `सोगांडया`, ` एकटा जीव सदाशिव` हे दादा कोंडकेसाठी गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. त्यांनी असंख्य गाजलेली नाटके लिहली. गेला माधव कुणीकडे हे त्यांचे गाजलेले नाटक होते.

वसंत सबनीस यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस (6-Dec-2017)

ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस (6-Dec-2018)

ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस (15-Oct-2016)

ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस (6-Nov-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*