तेलवणे, किशोर गौरीनाथ

ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकासवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.
[…]

कारळे, शिरीष

२७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!
[…]

गोडसे, सुनील

गडकरी रंगायतन हे ठाण्यातील एका नव्या पर्वाची नांदीच ठरलं. कारण रंगायतन झाल्यानंतर ठाण्यातील अभिनयाला एक मंच मिळाला आणि रंगायतनच्या कट्ट्यावर नाट्यसृष्टीला योगदान देणारे कलावंत मोठे होऊ लागले. त्यातलाच एक कलाकार म्हणजे “सुनिल गोडसे”!
[…]

सदाशिव पां. टेटविलकर

असं म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच त्याने आयुष्यात काय करायचे आहे हे निश्चित झालेले असतं ! त्यामुळेच की काय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं आणि तिथुन त्याचा, त्याच्या नशिबात लिहिलेल्या मार्गाने प्रवास सुरु होतो. असंच काहीसं इतिहास लेखक सदाशिव टेटविलकरांच्या बाबतीत झालं असावं.
[…]

अरुण म्हात्रे

आपल्या काव्यशैलीने, साहित्यामध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे अरूण म्हात्रे यांनी कविता, कथा, ललितलेखन, संपादन, प्रकाशन अशा क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. […]

नाडकर्णी, (डॉ.) आनंद

मन नेहमीच सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी अभ्यासाचा कुतूहलाचा विषय झालेला आहे. जगातील सर्वंत वेगवान आणि आवरायला कठीण गोष्ट कोणती; तर ते आहे आपलं मन ! पण काही व्यक्ती अशा आहेत ज्या मनावर अधिराज्य करतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! व्यवसायानं डॉ. नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ आहेत.
[…]

अशोक बागवे (प्रा.)

२० वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले कवी अशोक बागवे यांनी कवी म्हणून आपली एक वेगळी छाप साहित्यवर्तुळात उमटवली आहे.
[…]

तांबे, (डॉ.) अनिल भास्कर

आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो!
[…]

चिटणीस, अशोक सिताराम

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदीराचे ३० वर्षं प्राचार्य म्हणून कार्यभार वाहिलेल्या अशोक चिटणीस यांनी शिक्षण विषयक, साहित्यविषयक, सांस्कृतिक अशा अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.
[…]

सोमण, दा. कृ.

ठाणे शहर हे ज्याप्रमाणे संस्कृती कला, परंपरा यांचा आदर करतं त्याचप्रमाणे विज्ञान, तंत्रज्ञान यांचीही कास ठाण्यानी धरली आहे. याचीच साक्ष देतात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ म्हणून बिरुद मिळालेले श्री. दा.कृ. सोमण.
[…]

1 2 3 4 19