तेलवणे, किशोर गौरीनाथ

ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकासवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.
[…]

कारळे, शिरीष

२७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!
[…]

केळुसकर, (डॉ.) महेश वासुदेव

मराठी साहित्यक्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले कवी डॉ. महेश वासुदेव केळूसकर हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. मुळचे सिंधुदुर्गचे असणारे केळूसकर ठाण्यातील साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात ग्रंथालय चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत.
[…]

जोशी, (डॉ.) कल्पना संजय

गेली वीस वर्षे डॉ. कल्पना जोशी ह्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकतील, अशा प्रभावी औषधांचे संशोधन कार्यकरीत आहेत. त्या सध्या गोरेगांव येथील पिरामल लाईफ सायन्सेस या भारतीय औषध संशोधन संस्थेत औषधशास्त्र विभागाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 
[…]

जाईल, नारायण जनार्दन

स्थापत्यशास्त्रातील पदवी, कोयना प्रकल्प, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प (रांची), उद्योग मंत्रालय (नवी दिल्ली) असे अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले नारायण जनार्दन जाईल यांना ठाणं ओळखतं ते त्यांच्या लेखनामुळे.
[…]

रेळेकर, (डॉ.) राजन गजानन

डॉ. राजन रेळेकर यांनी १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत.
[…]

चव्हाण, अभिजीत बाबाजी

मालिका व नाटक अशा सर्वच क्षेत्रात आपला अभिनय लोकांपर्यंत पोहचवणारे अभिजित चव्हाण हे गेली २५ वर्षं अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
[…]

चिटणीस, (डॉ.) शुभा अशोक

हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्‍या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्‍या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्‍या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
[…]

रेळेकर, (डॉ.) सुवर्णा राजन

वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करुन अनेक वर्षे ठाणेकरांच्या स्वास्थ्याची काळजी घेणार्‍या डॉ. सौ सुवर्णा रेळेकर १९९२ पासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी व १९९७ पासून पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या सेवेत रुजू आहेत.
[…]

केंडे, अभिजीत सदाशिव

केंडे यांनी “यदाकदाचित”, “जागो मोहन प्यारे”, इत्यादी नाटकं, “शुभं करोती”, “सपनोसे भरे नैना”, “हम है लाईफ” अशा मराठी व हिंदी मालिका तसेच “गोजिरी”, “ती रात्र”, “तुला शिकवीन चांगला धडा”, “शर्यत”, “हाय काय नाय काय” इत्यादी चित्रपटांसाठी ध्वनी रचना केली.
[…]

1 2 3 4 19