नाशिककर, पियुश

पियुष नाशिककर हा मराठीवर जीवापाड प्रेम करणारा व पत्रकारितेद्वारे मराठीचा प्रचार व प्रसार करण्याची सतत मनिषा बाळगणारा एक तरूण पत्रकार आहे. आधुनिक व इंग्रजी वातावरणात राहिलेला वाढलेला असला तरी मराठीशी त्याची असलेली नाळ अजुन तुटलेली नाही. लोकमत या नामांकित वृत्तपत्राच्या मुंबई आवृत्तीचा उपसंपादक म्हणून व दक्ष पत्रकार म्हणून त्याची ओळख सर्वपरिचीत आहे.
[…]

करंदीकर, पराग

पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्‍या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. […]

परब, मंदार

मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्‍या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्‍या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे.
[…]

दामले, योगेश

योगेश दामले हे महाराष्ट्रामधील परिचीत व सुप्रसिध्द पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेशी व महाराष्ट्राच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्‍या आपल्या बांधवांशी दाखविलेली निष्ठा खरोखरीच स्पृहणीय आहे. असं म्हणतात की पत्रकारामध्येही एक समाजसेवक दडलेला असावा, व योगेश हे या अशा काही दुर्मिळ पत्रकारांच्या माळेमधील मणी आहेत, की ज्यांच्यातील झुंजार व तेजस्वी समाजसुधारक आपले दर्शन वारंवार इतरांना घडवित असतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास आहे व इतरांना जागृत करण्यासाठी चालविलेले व्रत आहे.
[…]

यज्ञोपावित, किरण

किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्‍या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.
[…]

तिखे, विरेंद्र

विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्‍यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो.
[…]

सपकाळ, ममता

ममता सपकाळ यांच्या जीवनाची कथा ही सर्वांच्या समोर आणायची झाली तर त्यावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते.
[…]

देशमुख, भालचंद्र

भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुखांची गणती भारताच्या राजकीय पटलावरील सर्वपरिचीत व अनुभवी व्यक्तिमत्वांमधल्या, रूबाबदार व तडफदार अधिकार्‍यांमध्ये होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतातील राजकीय वळणांची वाटचाल जवळून पाहिली होती, व राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक असलेल्या एका कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार देखील होते. 1951 मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले बी. जी देशमुख हे मुंबई राज्यातील पहिले आय. ए. एस. अधिकारी होते.
[…]

बापट, वैशाली

वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्‍या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या ‘वर्धमान ग्राफिक्स’ या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर 1 कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे.
[…]

कुकडे, गोपी

श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्‍याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली.
[…]

1 61 62 63 64 65 80