तिखे, विरेंद्र

विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्‍यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो.
[…]

सपकाळ, ममता

ममता सपकाळ यांच्या जीवनाची कथा ही सर्वांच्या समोर आणायची झाली तर त्यावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते.
[…]

देशमुख, भालचंद्र

भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुखांची गणती भारताच्या राजकीय पटलावरील सर्वपरिचीत व अनुभवी व्यक्तिमत्वांमधल्या, रूबाबदार व तडफदार अधिकार्‍यांमध्ये होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतातील राजकीय वळणांची वाटचाल जवळून पाहिली होती, व राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक असलेल्या एका कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार देखील होते. 1951 मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले बी. जी देशमुख हे मुंबई राज्यातील पहिले आय. ए. एस. अधिकारी होते.
[…]

बापट, वैशाली

वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्‍या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या ‘वर्धमान ग्राफिक्स’ या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर 1 कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे.
[…]

कुकडे, गोपी

श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्‍याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली.
[…]

झारेकर, पंकज

निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्‍या गहिर्‍या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्‍या निसर्गाकडूनच मिळाली.
[…]

जगताप, (प्रा.) बापुराव

प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.
[…]

कुंभार, भुपेश

भुपेश कुंभार हे भारताच्या गळ्यात सजणार्‍या तंत्रज्ञानाच्या माळेतील लकलकते मणी आहेत, व तंत्रज्ञान विकासाला विशेषतः गाड्या बनविण्याच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातील क्रांतीप्रती त्यांनी दिलेले योगदान अद्वितीयच मानले पाहिजे. सल्ला-मसलत हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे ते सध्या बजाज ऑटो लिमीटेड या नावाजलेल्या कंपनी क्षेत्रातील सर्व सल्ला मसलतींचे काम व ग्राहकांना आपल्या परिवारात खेचुन घेण्याचे काम मोठ्या निष्ठेने करीत आहेत.
[…]

शेटे, तुषार

तुषार शेटे हे टी. व्ही. नाईन या वेगाने फोफावणार्‍या व आदर्श समाजबांधणीचे स्वप्न घेवून जगणार्‍या वृत्तवाहिनीच्या मुंबई विभागामधले धडाडीचे तरूण पत्रकार आहेत. सिनीयर करस्पॉन्डन्ट या हुद्यावर कार्यरत असलेल्या शेटेंनी या वृत्तवाहिनीच्या अनेक मोहिमा, कारवाया, व भेटींमध्ये हिरिरीने सहभाग घेतला असुन या क्षेत्रातील अनुभव अतिशय दांडगा आहे. प्रवासाची त्यांना लहानपणापासूनच भयंकर आवड होती व ती आवड आता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पुर्ण करावयास मिळते आहे या गोष्टीचे त्यांना अतीव समाधान आहे.
[…]

दादरकर, अद्वैत

अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत. […]

1 61 62 63 64 65 80