खारकर, चिनार

ठाण्यातील केबल वाहिनीसाठी एका स्थानिक जाहिरातीचे संगीत संयोजन करुन २००१ साली आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या खअरकर यांनी आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवलेला आहे.
[…]

तेलवणे, किशोर गौरीनाथ

ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकासवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.
[…]

मुजुमदार, दीपक

दीपक मुजुमदार एक यशस्वी भरतनाट्यम नर्तक, गुरु आणि नृत्य दिग्दर्शक या तीनही वैशिष्ट्यांचे मानकरी ठरले आहेत. नृत्यातील आपल्या अभिनय कौशल्याने दीपकजींनी भारतीय शास्त्रीय नृत्याची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
[…]

मंडपे, (डॉ.) आशा रवींद्र

ठाण्यातील संगीत क्षेत्रातील आणखी एक मानाचं नावं व्हायोलिनवादक आणि संगीत विषयात पत्रकारीता करणार्‍या डॉ. आशा मंडपे होय. आशाताईंनी महाराष्ट्रातील आदिवासी वाद्यांवर विशेष संशोधन केले.
[…]

देव, (डॉ.) मंजिरी

डॉ. सौ. मंजिरी देव एक कथ्थक नृत्यांगना व गुरु असल्यामुळे, त्यांनी नृत्यविषयक भरपूर कार्य (सांस्कृतिक) केले आहे.

[…]

माने, विजू गोपाळ

प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले. 
[…]

पंजाबी, हिरा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि प्रदर्शनांमध्ये ५०० छायचित्रांहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करणारे हिरा पंजाबी यांना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. […]

केतकर, कुमार

४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अणि खर्‍या अर्थाने जगरहाटी करुन निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे पक्के ठाणेकर. आठ वर्षं “महाराष्ट्र टाईम्स”, त्यानंतरची सात वर्षे “लोकसत्ता”, नंतर `लोकमत’ आणि शेवटी `दिव्य मराठी’ या मराठी दैनिकांचे मुख्य संपादकपद त्यांनी भूषविले आहे. […]

बल्लाळ, मिलिंद

ठाण्यातील पत्रकार परंपरेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तीस वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ. १८ वर्षं टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ सध्या “ठाणे वैभव” या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
[…]

देशपांडे, प्रवीण केशव

गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.
[…]

1 4 5 6 7 8 17