प्रमोद व्यंकटेश महाजन

स्व. प्रमोद व्यंकटेश महाजन हे भारतीय जनता पक्षातील (भाजप) दुसर्‍या पिढीतील महत्त्वाचे नेते होते. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९४९ रोजी मेहबूबनगर, आंध्र प्रदेश येथे झाला. भारताच्या पंतप्रधानपदावर जाण्याची योग्यता असलेला अलिकडच्या काळातील एकमेव मराठी नेता अशी त्यांची प्रतिमा होती.

त्यांचा जन्म मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथे झाला. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. प्रकाश आणि प्रवीण हे त्यांचे बंधू तर प्रतिभा आणि प्रज्ञा या त्यांच्या भगिनी. भाजपाचे राष्ट्रीय नेते [LINKP][10324] गोपीनाथ मुडे [/LINKP]हे प्रमोद महाजन यांचे मेहुणे.

प्रमोद महाजन २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता संस्थेत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.

त्यांना पूनम ही मुलगी आणि राहुल हा मुलगा आहेत.

प्रमोद महाजन यांनी महाविद्यालयात इंग्लिशच्या अध्यापकाचे काम इ.स. १९७१ ते १९७४ पर्यंत केले. आणिबाणिच्या काळात ते सक्रिय राजकारणात उतरले.

प्रमोद महाजन यांनी इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून मोलाचे योगदान दिले.

भारतीय राजकारणात त्यांना एक उत्तम पॉलिटिकल मॅन्युप्युलेटर मानले जात असे. सर्वच पक्षांच्या नेत्यांशी आणि देशातील अनेक उद्योगपतींशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.

भाजपाच्या इंडिया शायनिंग या मोहिमेचे ते प्रणेते. मात्र दुर्दैवाने ही मोहिम यशस्वी झाली नाही आणि निवडणूकीतील पराभवामुळे भाजपाला सत्ता सोडावी लागली.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते प्रणेते होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उत्तन येथे प्रबोधिनीचे उत्तम केंद्र उभे राहिले.

घरगुती वादातून प्रवीण या त्यांच्या सख्ख्या भावाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दुर्दैवाने यातच प्रमोद महाजन यांचा ३ मे २००६ रोजी मुंबई येथे अंत झाला. याबरोबरच एक मराठी माणूस भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणे हे स्वप्नच राहिले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

## Pramod Mahajan

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*