फाटक, नानासाहेब

गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव असणार्‍या नानासाहेब फाटक यांचा जन्म २४ जून १८९९ रोजी झाला. फाटक यांनी “रक्षाबंधन” या नाटकातून नाट्यक्षेत्रात प्रेवश केला.या नाटकातील त्यांची गिरीधराची भूमिका खुपच गाजली होती. त्यानंतर त्यांना प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका केल्या. “पुण्यप्रभाव”, ‘श्री’, “सोन्याचा कळस”,“बेबंदशाही” अशा नाटकांमधून विविधांगी व्यक्तीरेखा साकारत रसिक मनांवकेफाटकांनी अधिराज्य केले.मराठी रंगभूमीवरील त्यांचे “नटसम्राट” हे नाटक इतके गाजले की त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली.शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील त्यांनी सादर केलेली “हॅम्लेट”ची भूमिका आणि राक्षसी कळसमध्ये त्यांनी केलेली “विक्रांत”ची भूमिका नाट्यप्रेमी कधीच विसरुच शकत नाही.
“थोरातांची कमळा” चित्रपटातील भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आले.
८ एप्रिल १९७४ या दिवशी नानासाहेब फाटक यांचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*