मन्ना डे

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मन्ना डे यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला.

प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.

पार्श्वगायनाची सुरवात त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर “जागो आयी उषा “हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या “बसंत बहार ” मधील “सुर ना सजे” मुळे तसेच “श्री चारसौबीस”मधील “प्यार हुआ “सीमा मधील”तू प्यारका सागर है””दो आंखे बारह हाथ”मधील “ऐ मालिक तेरे बंदे हम” किंवा “लागा चुनरीमे दाग” अश्या निवडक गीतातूनच झाली.

पाच दशकांहून जास्त काळाची संगीत कारकीर्द असलेल्या मन्ना डे यांनी विविध भाषांतील सुमारे ४००० गाणी गायली होती. हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळी, कन्नड आणि आसामी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. ९०च्या दशकात त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रातून निवृत्ती घेतली. १९९१ मध्ये नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ या चित्रपटामध्ये त्यांनी ‘हमारी ही मुठ्ठी मे’ हे अखेरचे गीत गायले.

सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.

मन्ना डे यांच्या आपल्या “ट्रेडमार्क‘ टोपी बद्दल मन्ना डे नी लिहिले आहे. एकदा ऐन डिसेंबर महिन्यात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी काश्मीतरला गेलो होते. त्या वेळी केवळ थंडीच नव्हती, तर बर्फ देखील पडत होता. व्यासपीठावर आल्यानंतर कडाक्याकच्या थंडीत गाणी म्हणायची कशी, असा प्रश्न माझ्यापुढे उपस्थित राहिला.

मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*