ममता कुलकर्णी

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याच्या अदांनी घायाळ करणा-या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे व्यक्तीगत आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे.

ममता कुलकर्णीचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबई येथे झाला. नव्वदच्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या बोल्डन अदानी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तिने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती.

तिरंगामध्ये राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्याे मुख्य भूमिका होत्या. १९९३ मध्ये आलेला चित्रपट ‘आशिक आवारा’ हा ममताचा पहिला चित्रपट हिट ठरला. याचवर्षी ममताने टॉपलेस फोटोशूट करून धुमाकूळ घातला होता. टॉपलेस फोटोशूट त्या वेळी चित्रपट इंडस्ट्री मध्ये नवी बाब होती.

ममता यासाठी तयार झाली. परंतु, तिला जेव्हाा सांगण्यातत आले की, या फोटोशूटसाठी तिला टॉपलेस व्हावे लागणार. ही गोष्ट तिला धक्का्दायक वाटली होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द ते फोटोशूट करणारा प्रसिध्द‍ फोटोग्राफर जयेश सेठने एका मुलाखतीत केला होता. जयेशच्या माहितीनुसार, ममता टॉपलेस कव्हर शूटविषयी ऐकून म्हणाली, ‘यामध्ये खूप रिस्क आहे.

ममताने कुठलीही तमा न बाळगता टॉपलेस पोझ दिली. ममताला हा फोटोशूट आवडला आणि हा फोटोशूट मार्केटमध्ये प्रसिध्द झाला. असे म्हटले जाते की, ज्या मासिकाच्या कव्हर पेजवर ममताचा टॉपलेस फोटोशूट प्रसिध्द झाला होता, त्या मासिकाचा प्रचंड खप झाला. या फोटोशूटमुळे ममता रातोरात लाईमलाईटमध्ये आली. परंतु काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही.

ड्रग्ज तस्कर प्रकरणी विक्की तुरुंगामध्ये गेला. ममता कुलकर्णीने ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगि’ नावाचा एक पुस्तक लिहिले आहे. ममताने २००२ मध्येे शेवटचा चित्रपट केला. तो चित्रपट होता – ‘कभी तुम कभी हम’. या चित्रपटानंतर ममता बॉलिवूडपासून दूर गेली. ममताचे नाव चित्रपटांपेक्षा अधिक अंडरवर्ड आणि ड्रग्ज तस्करीशी जोडले गेले.

ममता कुलकर्णीचा ‘करण अर्जुन’ चित्रपट चर्चित ठरला. तिने नसीब, बाजी, सबसे बडा खिलाडी, किस्मत, आशिक आवारा, क्रांतिवीर, चायना गेट, अहंकार या सारख्या चित्रपटात काम केले. असे म्हटले जाते की, राजकुमार संतोषी यांच्याच चायना गेट चित्रपटामुळे ममता कुलकर्णी वादात अडकली होती. ममताने संतोषीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*