काशिनाथ त्र्यंबक तेलंग

संशोधक, वकील

प्राच्यविद्यासंशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. ३० ऑगस्ट १८५० रोजी मुंबई येथे झाला.

त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रीक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे ते पहिले विद्यार्थी होत. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात प्रवेश केला. १८६८ मध्ये बी. ए. झाले. १८६९च्या शेवटी ते एम्. ए. झाले. त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे १८८९ मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली.

१८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे पहिले भारतीय कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.

काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे १ सप्टेंबर १८९३ रोजी निधन झाले.

अधिक माहितीकरिता खालील लेख वाचा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*