उमाशंकर दाते

ऑर्गन विक्रेते, व्यावसायिक

उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते हे एक भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक आहेत.

उमाशंकर दाते यांनी व्यवसाय म्हणून केबल टिव्ही नेटवर्क आणि डी.टी.एच.सर्व्हीसची एजन्सी हा व्यवसाय २००१ साली सुरु केला. त्याच दरम्यान त्यांचा एक संगीत नाटक बघण्याचा योग आला. ऑर्गन हे वाद्य महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय झालं ते या संगीत नाटकांमुळेच. उमाशंकर दाते यांच्या जीवनाला भविष्यात कलाटणी देणारी घटना घडली. जेव्हा त्यांनी आयुष्यात सर्वप्रथम ऑर्गन पहिला. ते ऑर्गन च्या प्रेमात पडले ते सुर सारखे कानात वाजू लागले. उमाशंकर दाते यांनी त्या आधी आणि Leg Harmonium हि वाद्ये होती. इथून ऑर्गन मिळवण्यासाठी धडपड चालू झाली. त्याच वेळी त्याची दुर्मिळता लक्षात आली कारण सामान्यत: अमेरिका आणि युरोप या देशातच ऑर्गन बनवले जात होते. पण १९५० च्या दशकानंतर ही चळवळ मंदावली. त्यानंतर Electronics च्या युगाचा प्रारंभ झाला. भारतात तर फक्त Harmonium बनविणा-या कंपन्या होत्या ऑर्गन बनवणारी एकही कंपनी नव्हती किंबहूना ऑर्गन चे अधिकृत ज्ञानही कोणाला माहित नव्हते. त्यामुळे जुना ऑर्गन मिळवण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्या कडे नव्हता.

त्यावेळी मुंबईस्थित मुकुंद आठवले यांच्या ओळखीतून एक जुन्या ऑर्गन चा Sound Box मिळाला.त्यापासून ऑर्गन बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला. जवळच श्री. वामन मेस्त्री (Harmonium Maker) यांच्या सहकार्याने ऑर्गन उत्तम बनला.

२००२ साली पहिला ऑर्गन त्यांनी पाहिला तर २००५ साली ऑर्गन चा sound box हाती आला आणि २०१३ साली पहिला भारतीय बनावटीचा ऑर्गन ते बनवू शकले. आत्तापर्यंत ८० हून अधिक ऑर्गन त्यांनी तयार केले आहेत. त्यांच्याकडे ६५ हजार रुपयांपासून १ लाख २० हजार रुपयांर्पयच्या किमतीचे ऑर्गन बनवून दिले जातात.

अधिक विस्तृत माहितीकरिता:

https://www.marathisrushti.com/articles/umashankar-date/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*