`कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे संस्थापक जयंत साळगावकर

व्यावसायिक

जयंत साळगावकरांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी मालवण येथे झाला. जयंत साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.  मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून ‘कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.

जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

`सुंदरमठ, देवा तूचि गणेशु’ ही पुस्तके व धर्म-शास्त्रीय निर्णय या ग्रंथाचे संपादन व लेखन त्यांनी केले.

जयंत साळगावकर यांचे २० ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

संजीव वेलणकर 
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पुणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*