कुलकर्णी, एकनाथ

एकनाथ गणेश कुलकर्णी यांचा जन्म भारत व चीन यांच्यामध्ये घोर रणसंग्राम पेटला असताना म्हणजेच 27 मार्च 1962 मध्ये झाला.

नाशिक येथील रहिवासी असलेले कुलकर्णी तेथील स्थानिक परिसरात त्यांच्या विवीध वैद्यकीय कौशल्यांसाठी व रोगांच्या अचुक निदानासाठी वाखाणले गेलेले आयुर्वेदिक तज्ञ आहेत. त्यांच्या क्लिनीकला स्थानिक लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतो व याला कारणीभुत आहे तो त्यांचा मृदु, मनमिळावू स्वभाव व रोगांच्या मुळावर अचुक घाव घालणारे, त्यांनी सुचविलेले अगदी नैसर्गिक व रामबाण औषधोपचार. आयुर्वेदाकडे तरूणांना पुन्हा आकर्षित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण वैयक्तिक चिकीत्सकाप्रमाणेच ते ‘महावसिद्यालया’ या नाशिकमधील नामांकित व प्रथितयश कॉलेजमध्ये सहाय्यक प्रचार्यांची भुमिका चोख निभावताना आपल्या देशातल्या अतिशय समृध्द व गहिर्‍या अशा औषधी वनस्पतीसंपत्तीचा, व आयुर्वेदिक श्रुंखलेचा प्रचार व प्रसार ते तरूणांमध्ये जोमाने करीत असतात. इतकी वर्षे आपल्या पुर्वजांनी, योगी पुरूषांनी व सिध्द ज्ञानी साधुंनी आपल्या आभ्यास, अनुभव व प्रत्यक्ष प्रयोगांवरून जोपासलेलं आयुर्वेदिक ज्ञान, नवीन पिढीकरिता कालबाह्य नाही हे त्यांचे, प्रामाणिक प्रयत्न बघून आपल्या लगेच लक्षात येतं.

आयुर्वेदामध्ये विशेष उल्लेखल्या गेलेल्या दुर्मिळ विषयांवर संशोधन करण्यात त्यांना विशेष रस आहे व आपल्या फावल्या वेळेचा उपयोग ते त्यांच्या संशोधनकार्यासाठी देतात. वैद्यकीय क्षेत्र हे त्यांच्या तीव्र आवडीचे क्षेत्र असले, तरी एका हळव्या कलाकाराचे अंगदेखील त्यांना लाभलेले आहे हे त्यांच्या निवडक परंतु दर्जेदार लिखाणावरून व कवितांवरून ध्यानात येते. पंचकर्म, मधुमेह, दमा व किडनीशी संबंधित अनेक आजारांवर संपुर्णतः नैसर्गिक व परिपुर्ण उपचार करण्यात त्यांनी विशेष नैपुण्य मिळविले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*