डॉ.अभय बंग

समाजसेवक, डॉक्टर

डॉ.अभय बंग यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी झाला.

डॉ. अभय बंग हे सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. सार्वजनिक आरोग्यसेवा परिणामकारकरीत्या कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी फोर्ड फेलोशिप अंतर्गत १९८३ साली अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एमपीएचचे शिक्षण घेतले.

बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

डॉ.अभय बंग यांच्या सर्च या संस्थेची वेबसाईट.

Home

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा

#DrAbhayBang

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*