कादंबरीकार

प्रा. बाळकृष्ण ऊर्फ सदा कर्‍हाडे

साठच्या दशकात उदयास आलेल्या लेखक, विवेचनकार आणि अनुवादकारांच्या पिढीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. बाळकृष्ण ऊर्फ सदा कऱ्हाडे यांचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. मराठी साहित्याबरोबरच इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, संस्कृत, कन्नड, उर्दू, रशियन भाषांचे जाणकार म्हणून सदा […]

कीर, गिरिजा उमाकांत

मागच्या पिढीत मासिक ही संकल्पना अतिशय लोकप्रिय होती आणि या मासिकातून ज्या ज्या लेखकांचे लेख अथवा कथा प्रसिद्ध झाल्या ते लेखक, लेखिका त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरल्या. […]

नागराथ संतराम इनामदार (ना. सं. इनामदार)

ना. सं. इनामदार इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी संशोधन, इतिहासाचे सर्जनशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली यामुळे कांदबरीकार ठरले. […]

देशमुख, रा.जे

स्वयंभू प्रकाशन संस्थेचे रा.जे. देशमुख हे संस्थापक आहेत. त्यांची प्रकाशन पध्दत ही त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच अनोखी अशी आहे. वि.स.खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांची आपल्या पुण्यातल्या गढावर राहण्याची व्यवस्था करून, खांडेकरांकडून “ययाती”, आणि रणजित देसाईंकडून, “स्वामी” […]

सारंग, विलास

११ जून १९४२ रोजी कारवार येथे जन्मलेल्या विलास सारंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. इंग्रजी विषयात एम्.ए, तसेच डब्ल्यू. एच्. ऑडन या इंग्रजी कवीवरील प्रबंधलेखनासाठी मुंबई विद्यापीठाची १९६९ साली पीएच्. डी. आणि अमेरिकेतील इंडियाना […]

पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु. शि. रेगे)

मराठी वाङ्मयविश्वात कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक अशी ओळख असलेल्या पु.शी.रेगे उर्फ पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत […]

भावे, पुरूषोत्तम भास्कर (पु.भा.भावे)

मराठी साहित्यामधील प्रतिभासंपन्न लेखक, उत्कृष्ठ वक्ते, व अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले पुरूषोत्तम भावे यांचा जन्म धुळे येथे जन्म झाला. हृद्यस्पर्शी कथा, चित्तवेधक प्रवासवर्णने, संवेदनशील व भावस्पर्शी नाटके, ओघवते ललितगद्य, चिंतनात्मक लेख इत्यादी विविध साहित्यप्रकार […]

पिटके, व. ह.

ग्रामीण कादंबरी लेखन या प्रांतामध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे व. ह. पिटके . ग्रामीण जीवनाची स्पंदने अचूकपणे रेखाटणार्‍या तसंच १९६० नंतर महाराष्ट्रातल्या खेडयांतील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पटलांवर औद्योगिकरणाचे झालेले मुलभूत व महत्त्वपूर्ण […]

सुनिता पुरुषोत्तम देशपांडे

सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली. १२ जुन १९४६ […]

पाध्ये, कमल

पत्रपंडित प्रभाकर पाध्ये यांची पत्नी असलेल्या कमल पाध्ये यांनी “बंध अनुबंध” या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे कधीही पुसली न जाणारी ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांच्या पतीदेवांच्या […]

1 2 3 4