पिटके, व. ह.

ग्रामीण कादंबरी लेखन या प्रांतामध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे व. ह. पिटके . ग्रामीण जीवनाची स्पंदने अचूकपणे रेखाटणार्‍या तसंच १९६० नंतर महाराष्ट्रातल्या खेडयांतील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पटलांवर औद्योगिकरणाचे झालेले मुलभूत व महत्त्वपूर्ण बदल, रसिकांपर्यंत पोहोचविणे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आभ्यासपुर्ण कल्पकतेने व संशोधनपूर्वक उमटवलेली लेखणी हा त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचा गाभा होता.

“शिदोरी“ ही त्यांची, १९६९ साली प्रकाशित झालेली व ग्रामीण भागातील नव्याने उदयास आलेली सत्तास्पर्धा रोमांचकपणे उलगडून दाखविणारी कादंबरी, सृजनशीलतेचं उत्तम उदहारण म्हणता येईल. त्याकाळात वाचकवर्गाने या कादंबरीचे भरभरुन प्रतिसाद दिला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*