शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार्‍यांची माहिती

देशपांडे (प्रा.) रमाकांत

गेली ५० वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते. प्रा. अ. का. प्रियोळकर व डॉ. एच.ए. ग्लीसन या भाषा शास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन. पदवी पदव्युत्तर वर्गांचा अध्यापन अनुभव.
[…]

लोहबरे, नरेंद्र श्रवणजी

नरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच आर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे […]

अहिरे, बाबुलाल केदु

बाबुलाल केदु अहिरे पाटणे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था या सरकारी शैक्षणीक संस्थेचे प्रमुख आहेत. […]

वहाळ, नवनाथ काशिनाथ

नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्‍या लढायांची झालर प्राप्त करून देणार्‍या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.
[…]

थोरात, सुभाष

सुभाष थोरात यांचा जन्म 17 जानेवारी 1957 मध्ये पावनवाडी येथे झाला. सरकारी सेवेमध्ये रूजु झाल्यानंतर, अभियांत्रिकी कौशल्यांमध्ये त्यांनी अभुतपुर्व असे यश मिळविले आहेत. थोरात हे शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनीयर असुन त्यांना कविता करण्याचा, लघुकथा लिहीण्याचा व वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके चाळण्याचा छंद आहे.
[…]

सुर्यवंशी, (डॉ.) रमेश सीताराम

डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्‍हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे.
[…]

भोंडसे, संपदा

संपदा भोंडसे, या यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक येथील जनसंपर्क अधिकारी या हुद्यावर काम करीत असून इच्छुक विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत, व त्यांच्या पुढील शैक्षणीक भविष्याचा आराखडा बनविण्यासंबंधीची हवी ती माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवित आहेत. विद्यार्थी व त्यांचे पालक यांना विद्यापीठाची, समस्त शिक्षकवर्गाची, विद्यापीठाकडुन घेतल्या जाणार्‍या कोर्सेसची, कार्यक्रमांची, उपक्रमांची, व अतिरीक्त स्पर्धांची सांगोपांग माहिती पुरविणे, पालक व शिक्षक यांच्यामधील नात्यामध्ये सुसुत्रता आणणे, व व्यवस्थापन व विद्यार्थीगण यांच्यामधील एकमेव दुव्याचे काम करणे अशा स्वरूपाचे, व्यापक असे कार्य त्या गेली अनेक वर्षे इमानदारीने करीत आहेत.
[…]

गिरी, चंद्रकांत

चंद्रकांत गिरी हे शिक्षण क्षेत्रात झळकलेले, मराठी तरूणाचे नाव असून ते सध्या सी. एस. कॉर्डिनेटर या पदावर काम करीत आहेत. इंग्रजी संभाषण कौशल्यावर प्रभुत्व कसं मिळवायच याचं साध्या व रोचक भाषेत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुध्द ज्ञान देणारा व मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेला हा विषय आहे व या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये व वस्तूंमध्ये सुसुत्रता आणण्याचे काम ते त्यांच्या पदाच्या व अधिकारांच्या अख्त्यारित राहून मोठ्या प्रामाणिकपणे करीत असतात.
[…]

मुळ्ये, अभिजीत

आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्‍या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्‍यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्‍या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्‍या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.
[…]

1 5 6 7 8 9 12