मोकाशी, बापूजी आत्माराम

पेणच्या मांगरुळ गावच्या इनामदारांपैकी एक. सन १९०८ साळी श्री.धारकर यांच्या बंगल्यावरील हत्यारे चोरुन नेण्याचा आरोप त्यांचे बंधू दामोदर आत्माराम मोकाशी व प्रभू समाजांतील इतर तरुणांवर आला होता. धारकर यांच्या बंगल्यासमोरच्या पायरीखालच्या गटारातच हत्यारे मिळाल्याने हे सहीसलामत सुटले. सार्वजनिक कामाची व ज्ञातीच्या सेवेची मोठी आवड असलेले एक गृहस्थ. पूर्वी यांची मोकाशी व चाचड या नावाची सोन्या चांदीच्या व्यापाराची मोठी पेढी होती. सध्या ते मुंबईस मुलाजवळ राहतात. नाणेगांव येथील जंगलसत्याग्रहात यांना ता. १४-१०-१९३० रोजी अटक झाली व तीन महिने सक्तमजुरी व पंधरा रुपये दंड अशी शिक्षा झाली. त्यांनी ती येरवडा व ठाणे तुरुंगात पुरेपुर भोगली. पेण तालुक्यात कॉंग्रेसचा प्रचार करुन त्यांनी मोठे कार्य केलेले आहे. त्यांचे मुलगे सुविद्य आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*