धनंजय कुलकर्णी यांचा जन्म ६ एप्रिल १९६२ रोजी सोलापुर येथे झाला. त्यांचे शिक्षण सुरवातीला सोलापूर, महाबळेश्वर व पुणे येथे झाले. बी. एस्सी. झाल्यावर सुरवातीला काही काळ त्यांनी बॅंकेत नोकरी केली. पण कॅमेर्याकडे ओढा असल्याने त्यांनी ती नोकरी सोडून १९९१ पासून फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीचा व्यवसाय सुरु केला.
सोनी, स्टार, झी यासारख्या चॅनलवरील साया, आतिश, तुम पुकार लो, हम परदेसी हो गये, ये नजदिकीयां, भंवर, परदे के पीछे या लोकप्रिय मालिकांचे डी.पी. म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
त्याचप्रमाणे पछाडलेला, नितळ, मेड इन चायना, जन्म, जेता यासारख्या मराठी आणि सत्य बोल, सुनो ना यासारख्या हिंदी चित्रपटांचेही चित्रिकरण त्यांनी केले आहे.
त्यांच्या रेनबो आर्टस या संस्थेतर्फे विविध जाहिरातिंच्या फिल्म, औद्योगिक फिल्म, लघुपट वगैरेची निर्मिती करण्यात येते.२००६ सालचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओग्राफीचा हीरो होंडा इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार त्याचप्रमाणे २००७ सालचा आयटीए पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांनी विविध पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. भारताप्रमाणे परदेशातही त्यांनी या क्षेत्रात काम केले आहे.
Leave a Reply