संत गोराकुंभार

Sant Gorakumbhar

(इ.स. १२६७ ते १३१७)

इ.स. १२६७ मध्ये तेरढोकी येथे यांचा जन्म झाला. यांचा कुंभाराचा व्यवसाय होता.

एक दिवस विठ्ठलभक्ती करता करता चिखल तुडवण्याचे काम सुरु होते. तेवढ्यात यांचे लहान बाळ तिथे आले व यांच्या पायाखाली चिखलात तुडवले गेले. विठ्ठलभक्तीत तल्लीन झाल्याने यांना त्याचा पत्ताच नव्हता. बायकोने नंतर मुलाची शोधाशोध केल्यावर तिला रक्तामासाचा चिखल दिसला.

पण गोरोबांची विठ्ठलभक्ती इतकी पराकोटीची की विठ्ठल कृपेने त्यांना त्यांचे बाळ परत मिळाले. तत्पूर्वी त्यांनी बायकोला स्पर्श करणार नाही ही शपथ पाळण्यासाठी स्वतःचे हात तोडून टाकले होते पण विठ्ठलनामाचा गजर होत असताना टाळ्या वाजवता येत नाहीत याचे त्यांना दुःख अनावर झाले. पण विठ्ठलाने अंतरीचा भाव जाणला व थोटे हातही पुन्हा पूर्ववत झाले.

त्यांनी १३१७ मध्ये देह ठेवला.

## Sant Gorakumbhar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*