श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – गिरनार

श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गिरनार ) | Shree datta sthan mahatmya darshan ( GIRNAR )

गिरीनार क्षेत्र हे भारतातील एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. हे भारतातील गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागातील जूनागड शहरात आहे. गिरीनार डोंगर हे भगवान दत्तात्रेयांचं प्रसिद्ध सिद्ध क्षेत्र आहे. भगवान दत्तात्रेय यांनी टेकडीच्या शिखरावर तपश्चर्या केली. येथे असलेल्या दत्त पादुकांचं दर्शन घेण्यासाठी १०,००० (दहा हजार) पायर्‍या चढून जावं लागतं. गिरीनर ठिकाण पूर्णपणे वनपरिसराने वेढलेले आहे. या शक्तिशाली क्षेत्रातील प्रत्येक पर्यटक खूप आनंददायी वातावरण अनुभवू शकतो. “जय गिरीनारी” आणि “दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा…” या दोन जपांनी दत्तात्रेय पादुका दर्शनाचा प्रवास हलका होतो असा भक्तांचा स्वानुभव आहे.

निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई

संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*