महाचर्चा – साहित्यिक कोण ?

काही महिन्यांपूर्वी “आम्ही साहित्यिक”वर एक चर्चा जोरात सुरु होती. महाराष्ट्रात अनेक थोर साहित्यिक असताना आपल्या ग्रुपवरच्या लेखकांनी स्वत:ला “साहित्यिक” म्हणून घेणे योग्य नाही असे कोणीतरी म्हटले होते. त्यासाठी चक्क ग्रुपचे नाव बदलायची सूचनासुद्धा काहीजणांनी केली. पोस्टवर मोठ्या प्रमाणात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या.

जसा मुकेश किंवा किशोरकुमार गायक तसाच एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणाराही गायकच.. सुनिल, सचिन, ब्रॅडमन हे जसे क्रिकेटपटू तसेच आपल्या आयपीएल, रणजी किंवा कांगा लिगमध्ये खेळणारेही क्रिकेटपटूच…

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील.

साहित्यिक हा साहित्यिक असतो… छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?

हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती… सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा….