संतोष करमाळकर (बीड)

साहित्यिक म्हणजे एक #वादळ

शांत वाहणाऱ्या समुद्री लाटांचा जसा अंदाज घेता येत नाही तसं एका साहित्यिकाचाही अंदाज घेता येत नाही, कारण एका कोपऱ्यात मळकट कपडे घालून वेड्या भोळ्या वाटणाऱ्या व्यक्ती च्या हातून सुद्धा साहित्य घडतं अन राजवाड्यात राजाच्या हातून सुद्धा घडतं ते साहित्य
सांगायच एवढंच की जेथे कुठलाच भेद नाही तो दरबार म्हणजे #साहित्यदरबार
साहित्यात जात,भेद,वय,पद, पैसा,मोह,माया, पहात नाही नदी प्रमाणे वाहणाऱ्यांच्या हातून सहज घडतं ते साहित्य त्याला उच्च विचारांची व रचनात्मक मांडणीची गरज असते
साहित्यिक कधीच विनाकारण कोणावर रागवत नाही त्याच आचरण एका संतांप्रमाने शांत व वैज्ञानिका सारखं वैदिक असतं
त्याला असतो मायेचा ओलावा अन प्रेमाचा पाझर
“एकांतात जो कधीच निराश, हताश,उदास नसतो तो #साहित्यिक”
“अन्यायाला वाचा फोडतो तो #साहित्यिक”
“सहज प्रेमाच्या कविता अन प्रवासाचं वर्णन करतो तो #साहित्यिक”
खरंच उगाच का असं म्हणलं जातं की “जे न दिसे रवीला ते दिसे एका कवीला”
“विचारांचा अंत नसतो,तो एका वेगळ्याच विश्वात रमत असतो तो #साहित्यिक”

भास त्याला काव्यांचा
अंत नसे विचारांचा…
शब्द जुळवतो परखड बोलतो
अंदाज निराळा जगण्याचा…

काव्यात्मक मांडणी विचारांची
राग नसे कोणाचा
साहित्य म्हणजे काय ?
ध्यास तेच शोधण्याचा…!!!

#संतोष_करमाळकर
बीड
santosh Karmalkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*