ताजिकिस्तान

ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.

ताजिकिस्तानाची बहुसंख्य प्रजा फारसीभाषक ताजिक लोकांची आहे. सामाईक ऐतिहासिक वारशामुळे संस्कृती व राहणी यांबाबत अफगाणिस्तान व इराणातील लोकांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. ऐतिहासिक काळात समानी साम्राज्याचा भाग असलेला हा देश इ.स.च्या २०व्या शतकात सोव्हियेत संघातील घटक प्रजासत्ताक बनला. ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य असे तत्कालीन नाव असणारा ताजिकिस्तान इ.स. ११९१ साली सोव्हियत संघातून बाहेर पडून सार्वभौम झाला.

राजधानी व सर्वात मोठे शहर :दुशान्बे
अधिकृत भाषा :ताजिक
राष्ट्रीय चलन :ताजिकिस्तानी सोमोनी (TJS)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*