पुणे शहरातील सात व्यापारी पेठा

आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. पुण्याचे प्रशासक रंगो बापुजी धडफळे यांनी इ.स. १६३० मध्ये शहाजी राजांच्या आज्ञेवरुन कसबा, सोमवार, रविवार आणि शनिवारपेठेची बांधणी केली आहे.