सूर्यापेट

सूर्यापेट हे आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. या शहराला ‘तेलंगण प्रांताचे प्रवेशद्वार’ असेही म्हटले जात असून, पूर्वी त्याचे नाव ‘भनुपुरी’ असे होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर असलेले हे शहर हैदराबाद व विजयवाडा शहरांपासून समान अंतरावर म्हणजे १२० किलोमीटरवर आहे. येथील बहुतांश लोक तेलगू भाषेचा वापर करतात.

देशातील पहिले स्वच्छ शहर
सूर्यापेट महापालिकेने आंध्र प्रदेश सरकारचा तसेच केंद्र सरकारचाही ‘सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहरा’चा पुरस्कार पटकावलेला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ISO 14001-2014 प्रमाणपत्र मिळवणारी सूर्यापेट ही भारतातील पहिली महापालिका आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*