शिवकाशी हे तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर राज्यातले एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील फटाके बनविण्याचा उद्योग प्रसिध्द आाहे. देशातील एकूण गरजेच्या ७० टक्के फटाके या शहरात तयार होतात. तसेच या शहरातील डायर्या बनवण्याचा उद्योगही प्रसिध्द आहे. या दोन्ही उद्योगांमध्ये जवळपास २५००० लोकांना रोजगार मिळाला आहे.
प्राचीन शहर
शिवकाशी शहराची स्थापना १५ व्या शतकात हरिकेसरी परीक्कीराम पांडियन यांनी केली. मदुराई संस्थानचा हा एक मोठा भाग होता. येथील हवामान वर्षभर कोरडे असल्याने या परिसरात कापूस मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. शहरातील भद्रकाली मंदिर प्रसिध्द आहे.
Leave a Reply